आता राजस्थानातील जमीन व्यवहार प्रकरणातही रॉबर्ट वढेरांची होणार चौकशी

आज जयपुर मध्ये ईडीपुढे होणार हजर

नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची आता राजस्थानातील जमीन व्यवहार प्रकरणातही ईडी म्हणजेच सक्तवसुली विभागाकडून उद्या मंगळवारी जयपुर येथील कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. त्या चौकशीसाठी रॉबर्ट वढेरा यांना त्यांच्या मातोश्रींसह चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. त्यानुसार रॉबर्ट यांच्या मातोश्री मौरीन याही या चौकशीला उपस्थित राहतील अशी शक्‍यता आहे.

आज दुपारीच रॉबर्ट वढेरा व त्यांच्या मातोश्री जयपुर मध्ये दाखल झाल्या आहेत. रॉबर्ट वढेरांनी ईडीपुढे हजर राहण्याची ही चौथी वेळ आहे. या आधी दिल्लीच्या ईडी ऑफिस मध्ये त्यांची तीन वेळा चौकशी झाली आहे.

गेल्या तीन चौकशींमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकूण चोविस तास त्यांची चौकशी केली आहे. जयपुर मधील हे प्रकरण बिकानेर मधील जमीन खरेदी व्यवहाराच्या संबंधातील आहे आणि राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रॉबर्ट वढेरा आणि त्यांच्या मातोश्री उद्या चौकशीला हजर राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)