अंधांना नोटा ओळखण्यासाठी आता मोबाईल ऍप 

रिझर्व्ह बॅंकेची न्यायालयात माहिती 
मुंबई – दृष्टीहीन तसेच अंध व्यक्तींना आता भारतीय चलनातील नोटा ओळखण्यासाठी मोबाईल ऍपचा वापर करता येणार आहे. या ऍपचे मोबाईल सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे काम सद्या प्रगतीपथावर असून सहा ते सात महिन्यात ते उपलब्ध होईल, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने आज उच्च न्यायालयात दिली.

चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने ऍड. उदय वारूंजीकर यांनी नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने जेष्ठ वकील श्‍याम मेहता यांनी भूमीका स्पष्ट करताना रिर्झव्ह बॅंकेने या संदर्भात चार तज्ज्ञांची कमिटी स्थापन करण्यात आली असून त्यांनी दिलेल्या अहवालानंतर मोबाईल ऍप तयार करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. काही महिन्यात हे सॉप्टवेअर उपलब्ध होणार आहे. तसेच 100 व त्या पेक्षा अधिक मुल्य असणाऱ्या नोटा ओळखण्यासाठी विशिष्ट चिन्हाचा वापरण्यात आल्याची माहिती दिली. यावर न्यायालयाने समाधान व्यक्त करून परदेशात अंधांना नोटा तपासता याव्यात यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते त्याची माहिती घ्या आणि त्याचा वापर करता येतो का पहा, असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेला देऊन याचिकेची सुनावणी तहकूब केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)