आता मसूद अजहर, हाफिझ सईदला निशाणा बनवा-अससुद्दीन ओवेसी 

नवी दिल्ली – आता मसूद अजहर,हाफिझ सईदला निशाणा बनवा असे उद्गार एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काढले आहेत. भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचे कंट्रोल रूमसह दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त केले.

सुमारे 300 दहशतवाद्यांचा सर्जिकल स्ट्राईकमध्ये खात्मा झाला. सर्जिकल स्ट्राईकचा सरकारचा निर्णय योग्यच असून त्याची आपल्याला अपेक्षाच होती. असे स्पष्ट करून ओवेसी म्हणाले, खरं तर ही कारवाई अगोदरच केली पाहिजे होती, आपण या कारवाईचे स्वागत करतो. ही कारवाई बिन लष्करी आहे, या परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या निवेदनाचा उल्लेख करून असदुद्दीन ओवेसी यांनी मागणी केली, की आता मसूद अजहर आणि हाफिझ सईद यांना निशाणा बनवावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)