आता मुंबईत “सायकल रूग्णवाहिका’

मुंबई : बाईक अँम्ब्युलन्सची योजना यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सायकल रूग्णवाहिका सुरू होणार आहे. यासाठी मुंबईतील अंधेरी, विलेपार्ले आणि शिवाजी पार्क परिसरात 20 सायकल रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतीच मान्यता दिली. सायकल रूग्णवाहिकेच्या माध्यमातून रूग्णांवर प्राथमिक उपचार केले जातील. याशिवाय गरज भासल्यास रूग्णाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

मुंबईतील चिंचोळ्या भागात रूग्णवाहिका पोहचण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने काही महिन्यांपूर्वी बाईक अँम्ब्युलन्सची सेवा सुरू केली. ही योजना रूग्णांसाठी फायदेशीर ठरल्याचे लक्षात आल्याने आरोग्य विभागाने सायकल रूग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही योजना पॅंरामेडिकच्या माध्यमातून आकाराला येईल. सायकल रूग्णवाहिकेसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या पॅंरामेडिककडे स्वत:चा मोबाईल असेल आणि तो 108 या क्रमांकाशी जोडण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

108 क्रमाकांच्या माध्यमातून कॉल आल्यानंतर हा पॅरामेडिक संबंधित रूग्णाच्या घरी जाऊन आजाराच्या तीव्रतेप्रमाणे प्राथमिक स्वरूपाचे उपचार करेल. सायकल रूग्णवाहिकेत वयोवृध्द रूग्णांसाठी किमान आवश्‍यक असणारी औषधे तसेच उपकरणे ठेवली जातील. गंभीर स्वरूपाचा आजार असल्यास 108 क्रमांकाच्या सेवेची रूग्णवाहिका बोलावून रूग्णाला नजीकच्या मोठ्या रूग्णालयात दाखल केले जाईल.

सायकल रूग्णवाहिकेवर बसविण्यात येणाऱ्या पेटीत औषधांसह स्टेथोस्कोप, रक्तदाब तपासणी उपकरण, ग्लुकोमीटर, तापमापक, सिरींज, कॉटन बॅडेज आदी उपकरणे असतील. सायकल रूग्णवाहिकेची किंमत, जीपीएस यंत्रणा, वैद्यकीय उपकरणे, सायकलची देखभाल दुरूस्ती तसेच मनुष्यबळ यामुळे योजनेवर वर्षाला 33 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)