आता मोबाईलवरून रेल्वेचे तिकीट मिळणार 

नवी दिल्ली  – रेल्वे मंत्रालयाने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी, तसेच तिकिट खरेदीसाठी वैयक्तिकरित्या उपस्थित न राहण्याची सुविधा देणाऱ्या आणि प्रवाशांना सुविधाजनक ठरणाऱ्या अनारक्षित मोबाईल तिकिट सुविधा आजपासून उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधाअंतर्गत ड्रॉईड, आयओएस आणि विंडोज फोनवरून अनारक्षित तिकिट, मासिक पास तसेच प्लॅटफॉर्म तिकिट काढता येतील. उपनगरीय रेल्वे विभाग वगळता देशातल्या सर्व रेल्वे विभागांमध्ये ही सुविधा आजपासून उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे अनारक्षित तिकिट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज आता भासणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डिसेंबर 2014 मध्ये मध्य रेल्वेच्या निवडक स्थानकांवर मोबाईल फोनद्वारे अनारक्षित तिकिट काढण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला गेला होता त्यानंतर 2015-17 दरम्यान चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि सिकंदराबाद या महानगरात हा उपक्रम सुरू करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)