#MarathaReservation आता लढाई श्रेयवादाची, मराठा आरक्षण कोणामुळे ?

मुंबई:  मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणारे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल(एटीआर) आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र आता राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आमच्यामुळे म्हणून राजकीय नेत्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण कोणामुळे ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठा समाज आरक्षण  विधेयक २०१८ या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली आहे. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. या विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण आणि SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

-Ads-

आमदार नितेश राणे यांनी “शेवटी राणे समितीचाअहवाल नाव बदलून स्वीकारावाचं लागला. अखेर सरकारला मराठा समाजाच्या समोर झुकावच लागल!”असे म्हटले आहे.

शिवसेनेने देखील पोस्टरव्दारे आरक्षण शिवसेनेमुळेच मिळाल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

राजकीय मंडळींनी मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर हजेरी लावली आहे. आझाद मैदानावर बोलत असताना अजित पवार म्हणाले, आपण आपली जबाबदारी पार पाडली आहे. ही श्रेय घेण्याची वेळ नाही. परुंतु, काही राजकारणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे चुकीचं असून  मराठा आरक्षणासाठी  ४० जणांनी आपला जीव दिला, त्यांचं बलिदान लक्षात ठेवायला हवे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली आहे. मागीसवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्यामुळे हा विजय माझाच असल्याचे राणेंनी म्हटले आहे.

एकीकडे भाजप आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांचा जयघोष करत जल्लोष सुरु केला आहे. तर दुसरीकडे अन्य पक्षातील नेते देखील श्रेय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने श्रेयवादाची लढाई रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)