आता निवडणुकीनंतर “मन की बात’

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम लवकरच सुरु होणार असून आतापासूनच प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन शेवटच्या “मन की बात’ द्वारे जनतेशी संवाद साधला. मात्र, निवडणुकीनंतरही आपण पुढील “मन की बात’मधून जनतेशी संवाद साधू असे म्हणत ही निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधानपदी असू असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

मोदी म्हणाले, पुढील दोन महिन्यांसाठी आम्ही सर्वजण निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त राहणार आहोत. मी स्वतः या निवडणुकीत उमेदवार आहे. निरोगी लोकशाही परंपरेचा सन्मान करताना पुढची “मन की बात’ मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. मार्च, एप्रिल आणि संपूर्ण मे महिना या तीन महिन्यांच्या काळात आमच्या सर्व भावना मी निवडणुकीनंतर नव्या विश्वासाने आपल्यासमोर पुन्हा एकदा “मन की बात’च्या माध्यमांतून मांडेन त्यानंतर अनेक वर्षे आपल्याशी संवाद साधत राहिन, अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पुन्हा पुढील सरकार स्थापन करु असा विश्वास व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)