मध्यप्रदेश – येत्या रविवारी लोकसभा निवडणुकांमधील शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा पार पडणार असल्याने सातव्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देशातील प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यप्रदेश येथील खरगौन येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’अबकी बार 300 पार फिर एक बार मोदी सरकार’
PM Narendra Modi in Khargone,Madhya Pradesh: From Kashmir to Kanyakumari, from Kutch to Kamrup, the whole nation is saying- pic.twitter.com/aD6yvvUtUl
— ANI (@ANI) May 17, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील खरगौन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देखील सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला.
PM Narendra Modi in Khargone,Madhya Pradesh: This Sunday when you go to cast your vote then you will be scripting history. After decades you will elect a majority govt for a second time in a row pic.twitter.com/hOFV3ms6Up
— ANI (@ANI) May 17, 2019
ते म्हणाले, “या रविवारी जेव्हा तुम्ही निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान करायला जाल त्यावेळी तुम्ही इतिहास रचणार आहात कारण बऱ्याच दशकांनंतर भारताची जनता सलग दोन वेळा स्पष्ट बहुमत असणारे सरकार निवडून देणार आहे. संपूर्ण देशात सध्या एकच घोषणा असून ती म्हणजे, ‘अबकी बार 300 पार, फिर एक बार मोदी सरकार'”