विम्बल्डन – ग्रॅंड स्लॅम स्पर्धावर हुकुमत गाजविणाऱ्या रॉजर फेडरर याला नमवत सर्वियाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन पुरूष एकेरीचं जेतेपत मिळवलं आहे. रविवारी सेंटर कोर्टवर झालेल्या महामुकाबल्यात नोवाक जोकोविचने आपलं सर्वोच्च कौशल्य दाखवत पाचव्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.
जवळपास 4 तास आणि 55 मिनिटांपर्यंत खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या जोकोविचने दुसऱ्या स्थानावरील रॉजर फेडररला 7-6(7-5), 1-6, 7-6(7-4), 4-6, 13-12 (7-3) अशा सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला.
Unbelievable. Unshakeable. Unstoppable.@DjokerNole wins his fifth #Wimbledon title in an instant classic, defeating Roger Federer 7-6(5), 1-6, 7-6(4), 4-6, 13-12(3) #JoinTheStory pic.twitter.com/S2Mx1yyJ3M
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2019