जोकोव्हिचला अभूतपूर्व कामगिरी करण्याची संधी

100व्या विजेतेपदापासून फेडरर तीन विजय दूर

सर्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडर ऐतिहासीक 100वे विजेतेपद पटकावण्यापासून केवळ तीन पाऊले दूर असून पॅरिस मास्टर्सच्या उपान्त्यपूर्व फेरीत त्याचा सामना जागतीक क्रमवारीत 10 व्या स्थानी असणाऱ्या केइ निशिकोरीयाच्याशी होणार असून यानंतर त्याच्या मार्गात नोव्हाक जोकोविच, खाचानोव्हा किंवा झ्वेरेव्हचे आव्हान असणार आहे.

पॅरिस – टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना नमवून पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या कामगिरीमुळे जोकोव्हिच पुरुष खेळाडूंच्या जागतिक मानांकन यादीत पहिल्या स्थानावर पोहचण्याच्या अगदी नजीक आला आहे. तर रॉजर फेडर देखिल आपल्या 100व्या विजेतेपदापासून अव्घे तीन पाऊले दूर आहे.

चार वेळा पॅरिस ओपन स्पर्धेचा विजेता असणारा जोकोव्हिचचा बोस्नियाचा प्रतिस्पर्धी दामिर झूमहुर याने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. या सामन्यात जोकोव्हिच 6-1, 2-1 असा आघाडीवर होता. उपान्त्यफेरीत पोहचण्यासाठी जोकोव्हिच याची लढत आता जागतिक मानांकन यादीत पाचव्या स्थानावर असणाऱ्या मरिन चिलीच याच्याशी होणार आहे. तर, दुसरीकडे महान टेनिसपटू रॉजर फेडरर याने इटलीच्या फॅबिओ फॉगनिनीचा 6-4, 6-3 असा सहज परभव करत स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पॅरीस मास्टर्स मधून राफेल नदालने माघार घेतल्यामुळे मंगळवारी जोकोव्हिच तब्बल दोन वर्षानंतर मानांकन यादीत पुन्हा पहिल्यास्थानावर विराजमान होईल. 31 वर्षीय जोकोव्हिच याची कामगिरी ही खूप कौतुकास्पद आहे. पाच महिन्यनपूर्वी फ़्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने तो मानांकन यादीत 22 व्या स्थानावर फेकला गेला होता. त्याचे ते मागील 12 वर्षातील सर्वात निच्चांकी मानांकन होते. त्यानंतर त्याने विम्बल्डन, अमेरिकन ओपन जिंकताना आप्ले 14 व्या ग्रॅंडस्लॅमसह मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थानाकडे आगेकूच सुरु केली. त्यातच त्याने कारकिर्दीत सहाव्यांदा सलग 20 टूर सामने जिंकण्याची किमयाही केली, त्याचबरोबर मागील 30 पैकी 29 सामन्यात त्याने विजय मिळवला आहे.

यावेळी बोलताना तो म्हणाला, मागील वर्षी मी ज्याप्रकारे विचार करत होते त्यानुसारच मी हे यश मिळवले आहे. आणि हे यश खरेच अभूतपूर्व आहे. पाच महिन्यांपूर्वी मी जसा खेळत होतो आणि त्याचा माझ्या मानांकनावर जो परिणाम होत होता. त्याची आता तुलना केल्यास त्या कामगिरी आणि या कामगिरी मध्ये बरेच अंतर आहे आणि त्याचा मला खुप आनंद आहे. तसेच माझी ही कामगिरी खुप अभूतपुर्व आहे असे मला वाटते असेही त्याने यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)