तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना 

नवी दिल्ली – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जारी केली. निवडणूकांच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 14 राज्यांमध्ये 23 एप्रिल रोजी 115 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहेत. या मतदारसंघांमध्ये गोवा, गुजरात, केरळ, दादरा आणि नगर हवेली, दमण-दिव आणि पुद्दुचेरीमध्ये मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्‍चिम बंगालमध्ये सर्व सातही टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आज अधिसूचना जारी झाल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 एप्रिल ही अखेरची तारीख असेल. तर 5 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिलपर्यंत असणार आहे, असे या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)