उर्जित पटेल यांना नोटीस

रघुराम राजन यांनी लिहीलेले पत्रही जाहीर करण्याची सूचना

नवी दिल्ली –
देशातील सरकारी बॅंकांचे कर्ज बुडवलेल्या लोकांची यादी सादर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही त्याची पुर्तता केली नाही या कारणावरून केंद्रीय माहिती आयुक्तांनी रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना नोटीस जारी केली आहे. बुडित कर्जाबाबत रघुराम राजन यांनी सरकारला लिहीलेले पत्रही त्वरित जाहीर करा अशी महत्वपूर्ण सूचनाही माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरला केली आहे.

50 कोटींपेक्षा अधिक कर्ज घेऊन ते बुडवलेल्या लोकांची यादी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांकडे मागण्यात आली होती. त्यांनी ती यादी देण्यास नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांना ही यादी जाहीर करण्याची सूचना केली होती. पण तरीही त्यांनी ही यादी न दिल्याने आपल्यावर कडक दंडात्मक कारवाई का करू नये याचा खुलासा करा अशी कारणे दाखवा नोटीस केंद्रीय माहिती आयुक्तांनी उर्जित पटेल यांना बजावली आहे.

उर्जित पटेल यांनी दक्षता आयोगाच्या कार्यक्रमात बोलताना मात्र प्रामाणिपणा, पारदर्शकतेच्या तत्वाची भलामण करून दक्षता आयोगाच्या सुचना व मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्याचे प्रतिपादन केले होते याची आठवणही केंद्रीय दक्षता आयोगाने त्यांना करून दिली आहे. 16 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी या नोटीशीला उत्तर द्यावे अन्यथा त्यांच्यावर भारी दंड लागू करावा लागेल असेही आयुक्तांनी आपल्या नोटीशीत म्हटले असल्याने उर्जित पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)