मनसे नेते नितीन नांदगावकर यांना तडीपारीची नोटीस ; जनता रस्त्यावर !

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली. कायदा हातात घेतल्याचे कारण सांगत मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान मुंबईकर नांदगावकर यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तसेच पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत आहेत.

नितीन नांदगावकर मनसेच्या वाहतुक सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी रिक्षा चालकांची दादागिरी, रस्त्याचे प्रश्न, पासपोर्ट घोटाळा असे अनके घोटाळे उघडीस आणले. त्यामुळे कायदा हातात घेण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी आगामी निवडणुकांच्या तोंडावर ही कारवाई केल्याने मनसेने याला विरोध केला आहे.

-Ads-

नितीन नांदगावकर म्हणाले, संघर्ष अटळ आहे. माझी भीती नेमकी कोणाला वाटतेय ?मुबंई पोलीस मला २ वर्षासाठी तडीपार करायला निघालेत.आज मला माय-बाप जनतेने सांगावे. सर्वसामान्य नागरिकांना माझी भीती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले.

महाराष्ट्र माझा आहे कुठे कुठे मला तडीपार करणार. जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय. माझा शब्द आहे जनतेला. मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणारच.

महाराष्ट्र सैनिक श्री. नितिन नांदगावकर यांना मुबई पोलीस यांनी तडीपारी ची नोटीस काढली आहे त्याबद्दल सर्व सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐका ..Nitin Nandgaonkar #जनतेचेन्यायालय #जनतादरबार

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Wednesday, 20 February 2019

What is your reaction?
35 :thumbsup:
17 :heart:
3 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)