नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम, तसेच पत्नी नलिनी आणि सून श्रीनिधी यांना ब्लॅक मनी प्रकरणात आयकर (आयटी) विभागाने दाखल केलेल्या अपीलावर सर्वोच्च न्यायालयाने नोटिस जारी केली आहे.
Supreme Court issues notice to Karti Chidambaram, on hearing an appeal filed by the Income Tax (IT) Department in a black money case.
SC also issued notices to Karti's Chidambaram's mother, Nalini & wife, Srinidhi on the appeal filed against quashing of their prosecution.— ANI (@ANI) April 16, 2019
आयकर विभागाने माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी, पुत्र कार्ती आणि सून श्रीनिधी यांच्या विरुद्ध ब्लॅक मनी कायद्याखाली चार आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर परदेशातील मालमत्तेची माहिती दडवून ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
चेन्नईतील एका विशेष न्यायालयात ब्लॅक मनी कायद्याच्या कलम ५० नुसार (परदेशातील उत्पन्न आणि मालमत्ता), तसेच कर अधिनियम, २०१५ अंतर्गत आरोपपत्र किंवा फिर्यादीबाबतच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नलिनी चिदंबरम, कार्ती आणि श्रीनिधी यांच्यावर परदेशातील संपत्ती अंशत: किंवा पूर्णत: उघड न करण्याबाबतचे आरोप ठेवण्यात आले आहेत. ब्रिटनमधीस केंब्रिज येथील ५ कोटी ३७ लाखांची संपती, त्याच प्रमाणे ब्रिटनमधीलच ८० लाख रुपयांची इतर संपत्ती आणि अमेरिकेत असलेली ३ कोटी २८ लाख रुपयांच्या संपत्तींची माहिती या तिघांनी लपवून ठेवल्याचा त्यांच्यावर थेट आरोप ठेवण्यात आला आहे.