भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे आणि आरपीआयला बेकायदा होर्डिग प्रकरणी नोटीस 

मुंबई –  शहर विद्रुप करणारी बेकायदा होर्डिंग उभारण्यात अग्रेसर असणाऱ्या भाजपसह इतर तीन पक्षांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. एम.एस सोनक यांनी आज या पक्षांना दणका दिला. राज्यातील बेकायदा होर्डिंग बाबत सुस्वराज्य फाऊंडेशन तसेच भगवानजी रयानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरआज सुनावणी झाली.

यावेळी बेकायदा होर्डिंग हटविण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही राजकीय पक्षांचे पदाधिकारी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर लावतात. ही राजकीय मंडळी पालिका नियमावलीचे सरळसरळ उल्लंघन करतात, हे उघड झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या राजकिय पक्षांची नावे द्या, असे आदेश न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांना दिले होते. त्यानुसार याचिकाकर्त्यांच्यावतीने राज्यात बेकायदा होर्डिंग असलेल्या विविध पक्षांची माहिती ऍड उदय वारुंजीक यांनी न्यायालयाला  दिली. याची दखल न्यायालयाने घेऊन या चारही राजकीय पक्षांना न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आणि या याचिकेची सुनावणी 6 डिसेबर पयंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)