नोटाबंदीः फसलेली “क्रांती’ (भाग ३)

नोटाबंदीःफसलेली “क्रांती’ (भाग २)

नोटाबंदी हे एक “क्रांतिकारक पाऊल’ असल्याचे 2016 च्या अखेरीस देशाला सांगितले गेले. जसजसे त्याचे परिणाम दिसू लागले, तसतसे नोटाबंदी करण्यामागची वेगवेगळी कारणे सांगितली जाऊ लागली. दहशतवादी, नक्षलवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखणे, काळा पैसा बाद करणे, कॅशलेस अर्थव्यवस्थेची सुरुवात करणे, बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे यापैकी एकही हेतू सफल झाला नाही, हेच रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे आणि पारदर्शकता प्रिय असणाऱ्यांनी लोकांना पडलेल्या प्रश्‍नांची तर्कसुसंगत उत्तरे द्यायला हवीत. 

आज अशा गावांमधील सर्व व्यवहार पुन्हा रोखीने सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी जेवढी रोकड बाजारात फिरत होती, त्यापेक्षा अधिक रोकड आजमितीस बाजारात आहे. असे असेल तर नेमका कोणता हेतू सफल झाला? 15 ऑगस्ट 2017 रोजीच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी असे सांगितले, की जे तीन लाख कोटी रुपये कधीच बॅंकिंग प्रणालीत येऊ शकले नसते, ते आता आले आहेत. वस्तुतः त्यांच्या पहिल्या (आठ नोव्हेंबर 2016 च्या) भाषणानुसार, या नोटांची “रद्दी’ होणे अपेक्षित होते. मात्र, तसे होत नाही म्हटल्यावर “गोल पोस्ट’ बदलून हा पैसा बॅंकिंग प्रणालीत आणण्याचाच जणू हेतू यामागे होता, असे सांगितले जाऊ लागले.

म्हणजे, बॅंकिंग प्रणालीत आलेला पैसा काळा की गोरा, हे जणू पाहिलेच जाणार नव्हते. महत्त्वाची बाब म्हणजे, काळा पैसा नोटांच्या स्वरूपात फारसा बाळगला जात नाही, तर तो रिअल इस्टेट, सोने, परदेशी चलन आदींमध्ये गुंतविला जातो, असे काही तज्ज्ञ सांगत होते. मात्र, त्यावेळी नोटाबंदीची ही “क्रांती’ इतकी जोमात होती, की कुणीच काही ऐकायला तयार नव्हते.

बनावट नोटांवर नियंत्रण आणण्याचे सरकारचे लक्ष्यही साध्य झालेले नाही, हे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. कारण नव्या नोटांची नक्कल होणारच नाही, हा दावा फोल ठरला असून, अनेक ठिकाणी बनावट नोटा सापडल्या आहेत. 2017-18 या कालावधीत पाचशे रुपयांच्या 9892 तर दोन हजार रुपयांच्या 17929 बनावट नोटा पकडल्या गेल्या आहेत. या नोटाही बॅंकिंग प्रणालीत येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दोन हजार रुपयांच्या नोटेत “मायक्रोचिप’ बसविली असल्याची हवा निर्माण करण्यात आली. ही केवळ व्हॉट्‌स ऍपवरील अफवा नव्हती. अत्यंत प्रतिष्ठित अशा वृत्तवाहिन्यांनीसुद्धा हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते.

संतोष घारे 
सनदी लेखापाल 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)