नोटबंदीचा काळ्यापैशावर बिलकुल परिणाम नाही : ओ.पी. रावत

मावळत्या मुख्य निवडणूक आयुक्तांचे वक्तव्य

नवी दिल्ली: देशातील काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी नोटबंदी करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी या निर्णयाचा काळ्यापैशावर कोणताही परिणाम झालेला दिसून आलेला नाही असे प्रतिपादन मावळते मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी केले आहे. ते म्हणाले की निवडणुकीच्या काळात सगळीकडेच मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड आढळून येते. नोटबंदी नंतरही या बेहिशोबी पैशाचा वापर थांबलेला नाही असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की सध्या मिजोराम, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरूी आहे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणी मोहीमेत तब्बल 200 कोटींहून अधिक रोकड आढळून आली आहे. ही रोकडे प्रभावशाली व्यक्तींकडूनच उपलब्ध होते हे सरळ आहे. त्यामुळे काळ्यापैशाच्या वापरावर नियंत्रण आले आहे किंवा हा पैसा निर्माण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे असा ठोस निष्कर्ष आपल्याला काढता येत नाहीं असे ते म्हणाले. रावत हे नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त या पदावरून निवृत्त झाले आहे त्यानंतर ते एका वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)