नोटा बंदी, कर्जमाफीमुळे 80 कोटींचा तोटा

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांची माहिती : सरकारने सहकार चवळ दाबून टाकली

राजगुरूनगर: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी 10 वर्षांपूर्वी सर्वांत मोठी कर्जमाफी केली होती. आताच्या सरकारने केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सहकार चळवळ दाबून टाकली आहे. नोटाबंदी आणि कर्जमाफीमुळे बॅंकेला 70 ते 80 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. नोटबंदीमुळे अजूनही 22 कोटी 25 लाख रुपये पडून आहेत. जिल्हा बॅंकेला झालेला तोटा हा सर्व सामान्य सभासदाला झालेला तोटा आहे, असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक आहे. मात्र हे सरकार सहकाराच्या विरोधात आहे. सर्वसामान्य नागरिकांची गरज भागविणारे सहकार क्षेत्र आहे मात्र ते संपुष्ठात आणण्याचा प्रकार या सरकारने केला आहे. कांद्याला भाव नाही, उसाला भाव नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही केवळ आश्‍वासने दाखवून सत्तेवर आलेल्यांना खाली खेचण्याची वेळ आली आहे.
– दिलीप मोहिते, माजी आमदार, खेड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजगुरुनगर येथे पाबळ रस्त्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची तालुक्‍यातील 17 व्या शाखेचे उद्‌घाटन, एटीएम सुविधेचा शुभारंभ व प्राथमिक शेती संस्थांचा सत्कार बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते आज (मंगळवारी) झाले, त्यावेळी ते बोलत होते.

रमेश थोरात म्हणाले की,पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्याबरोबरच बॅंक शाखांचे नुतनीकरण केले आहे. खेड तालुक्‍यात आता 17 शाखा आहेत. ग्राहकांची वाढती संख्या आणि त्यांना सेवा सुविधा देण्यासाठी लवकर चाकण परिसरात 18 वी शाखा सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

त्यावर लवकरच निर्णय
सहकारी सोसायट्यामध्ये काम करणाऱ्या सचिवांच्या भरतीचा मुद्दा उच्चन्यायालयात प्रलंबित आहे. लवकरच त्याच्यावर निर्णय होणार आहे. सचिवांची कमतरता आहे. त्यावर निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)