ना मेरी हार ना तेरी जीत.. (भाग २)

ना मेरी हार ना तेरी जीत.. (भाग १)

दुबईत झालेल्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेर भारताने बांगला देशाचा सामन्याचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला आणि लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचा जीव भांड्यात पडला. बांगला देशाच्या शतकी सलामी भागीदारीनंतर आणि सलामीवीर लिंटन दासच्या शतकानंतरही (117 चेंडूत 121 धावा) बांगला देशाचा डाव 222 धावातच मर्यादित ठेवल्याने अगदी सोपा वाटणारा विजय कर्णधार रोहित शर्मा (48), महेंद्र सिंग धोनी (37) आणि दिनेश कार्तिक (36) यांच्या योगदानानंतरही कठीण होत गेला आणि सामना अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूपर्यंत ताणला गेला. एका चित्तथरारक सामन्यात भारताचा विजय होऊन आठव्यांदा आशिया चषकावर भारताने नाव कोरले. 

फायटर अफगाणिस्तानने यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद शाहजादच्या 124 (11 चौकार 7 षटकार) आणि मोहम्मद नबीच्या 64 (3 चौकार 4 षटकार) धावांच्या जोरावर 9 बाद 252 (11 षटकार 17 चौकार) ची मजल मारली. भारतीय भरभक्कम आणि पूर्ण भरात असलेल्या फलंदाजीसमोर हा काही “फायटिंग’ स्कोअर नव्हता हे राहूल-नायडूने शतकी भागीदारीने दाखवून दिले. पण पुढे कार्तिक 44 आणि जडेजा 25 वगळता सारे हजेरी लावत गेले. अफगाणिस्तानचे चपळ क्षेत्ररक्षण आणि टिच्चून गोलंदाजीसमोर भारताचा डाव एक चेंडू आणि विजयासाठी एक धाव कमी असताना 252 धावांवर समाप्त झाला. सामना संस्मरणीय टाय झाला.

अफगाणिस्तानसाठी ही कामगिरी विजयापेक्षा कमी नव्हती. सुपर फोरमधील अफगाणिस्तानचे तीनपैकी एक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत (बांगला देशविरुद्ध तीन धावांनी पराभव)आणि एक सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूत एकच धाव हवी असताना पाचव्या चेंडूवर जडेजा बाद झाला. पाचव्या चेंडूपर्यंत (भारताविरुद्ध बरोबरी) आणि एक सामना शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत (पाकिस्तानविरुद्ध तीन गडी राखून पराभव) रंगला. पण सामने जिंकता आले नाहीत, तरी अफगाणिस्तानच्या संघाने जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. त्यांच्या पुढील सामन्यांची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहतील यात काही शंका नाही.

वन डे इंटरनॅशनलमधील टाय सामन्यांचा मागोवा घेतला, तर आजवर 36 सामने टाय झाले आहेत. पहिला टाय सामना झाला 11 फेब्रुवारी 1984 रोजी मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीजमध्ये. वेस्ट इंडिजने प्रथम खेळ्ताना 5 बाद 222 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 बाद 222 धावा बनवल्या, 36 वा सामना 25 सप्टेंबर रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. मॅच टाय झालेली असूनही दोन वेळा टाय ब्रेकरने ज्याच्या कमी विकेट गेल्या त्याला विजेता जाहीर करण्यात आले. या नियमाचा फायदा एकदा भारताला आणि एकदा पाकिस्तानला झाला आहे. 20 मार्च 1987 रोजी हैद्राबाद येथे झालेल्या सामन्यात 44 ओव्हर्समध्ये भारताच्या 6 बाद 212 तर पाकिस्तानच्या 7 बाद 212 धावा झाल्या होत्या. भारताने एक गडी कमी गमावलेला असल्याने भारताला विजयी ठरवण्यात आले.

14 ऑक्‍टोबर 1988 रोजी लाहोर येथे झालेल्या पाकिस्तान ऑस्ट्रेलिया समन्यात ऑस्ट्रेलियाने 45 षटकांत 9 बाद 229 धावा केल्या होत्या, उत्तरादाखल पाकिस्तनने 45 ओव्हर्समध्ये 7 बाद 229 धावा केल्या. पाकिस्तानच्या दोन विकेट्‌स कमी गेल्याने पाकिस्तानला विजयी ठरवण्यात आले.

भारताचे एकूण आठ सामने टाय झाले आहेत. 1991 साली पर्थ (ऑस्ट्रेलिया) येथे वेस्ट इंडिजविरुद्ध, 2) 1993 साली इंदूर येथे झिंबाब्वे विरुद्ध, 3) 1997 साली पार्ल येथे झिंबाब्वे विरुद्ध 4) 2011 साली बेंगळुरू येथे इंग्लंड विरुद्ध 5) 2011 सालीच लंडन येथे इंग्लंड विरुद्ध 6) 2112 साली ऍडलेड येथे श्रीलंकेविरुद्ध 7) 2014 साली ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध आणि 8) 2018 साली दुबई येथे अफगाणिस्तानविरुद्ध.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)