ना मेरी हार ना तेरी जीत.. (भाग १)

दुबईत झालेल्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेर भारताने बांगला देशाचा सामन्याचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला आणि लाखो-करोडो क्रिकेटप्रेमींचा जीव भांड्यात पडला. बांगला देशाच्या शतकी सलामी भागीदारीनंतर आणि सलामीवीर लिंटन दासच्या शतकानंतरही (117 चेंडूत 121 धावा) बांगला देशाचा डाव 222 धावातच मर्यादित ठेवल्याने अगदी सोपा वाटणारा विजय कर्णधार रोहित शर्मा (48), महेंद्र सिंग धोनी (37) आणि दिनेश कार्तिक (36) यांच्या योगदानानंतरही कठीण होत गेला आणि सामना अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूपर्यंत ताणला गेला. एका चित्तथरारक सामन्यात भारताचा विजय होऊन आठव्यांदा आशिया चषकावर भारताने नाव कोरले. 

पण या संपूर्ण स्पर्धेत छाप पाडली ती अफगाणिस्तानने. 
पाकिस्तान सीमामार्गे क्रिकेटने अफगाणिस्तानात प्रवेश केला. 90 च्या दशकात पाकिस्तानातून परतलेल्या अफगाण शरणार्थींनी अफगाणिस्तानात क्रिकेटचे बीज लावले. 1995 साली अफगाण क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली. 2001 मध्ये आयसीसीची मान्यता मिळाली आणि 2015 मध्ये अफगाणिस्तान वर्ल्ड कप साठी पात्र ठरून स्कॉटलंडविरुद्ध त्याने पहिला विजय मिळवला. काही महिन्यांपूर्वी कसोटी दर्जा मिळालेल्या अफगाणिस्तानने पहिली कसोटी खेळली ती भारताविरुद्ध.

दहशतवाद आणि यादवी युद्धाने शापित अफगाणिस्तानात रोजचे बॉंबस्फोट, आत्मघातकी हल्ले, दहश्‍तवाद आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षाव या साऱ्याला सामोरे जात जगणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाने आशिया कप
स्पर्धेत कोट्यवधी क्रिकेट रसिकांची मने जिंकली. श्रीलंकेला बाहेर ढकलत सुपर फोरमध्ये प्रवेश केला आणि जिंकता आला नाही, तरी आपला प्रत्येक सामना अखेरच्या क्षणापर्यंत झुंजवला. या स्पर्धेतील सर्वात चित्तथरारक सामना म्हणून भारत-अफगाणिस्तान सामन्याचीच निवड करावी लागेल. या

-Ads-

सामन्याबाबतच्या आठवणी- 
“क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी ‘ म्हणतात त्याचा प्रत्यय अशिया कप स्पर्धेत अनेकदा आला आणि भारत अफगाणिस्तानच्या मॅचच्या वेळी तर त्या ग्लोररियस अनसर्टन्टीचा प्रत्यय अगदी प्रकर्षाने आला. रात्री ती मॅच पाहात असताना सुरुवातीला तर ती अगदीच मिळमिळीत, एकतर्फी वाटली. भारत सहजपणे अगदी एक हाती, म्हणजे सलामीच्या जोडीवरच सामना जिंकणार असे चित्र दिसत होते. अफगाणिस्तानच्या 8 बाद 252 या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या अंबाती रायडू आणि के. एल. राहुल या अनियमित जोडीने 110 ची सलामी दिली.

या जोडीने शतकी पल्ला पार केल्यानंतर असेच वाटले की हीच जोडी विजयापर्यंत नेते की काय. आणि तेव्हा मॅचमधेल इंटरेस्ट समाप्त झाल्यासारखेच वाटले. फार तर एक दोन विकेट गमावून आणि पाच दहा ओव्हर्स राखून भारत सहजपणे मॅच जिंकेल असेच भाकित तमाम क्रिकेट प्रेमींनी-अफगाणिस्तानचे चाहते सोडून-केले असावे.आम्हीही उगाच कशाला जागरण करा, किती विकेट्‌सनी जिंकले ते सकाळी पाहू असा विचार करून निद्राधीन झालो.

सकाळी उठल्यानंतर बातम्यांमध्ये भारत-अफगाणिस्तान मॅच टाय हे हेडिंग वाचून धक्काच बसला. हा म्हणजे मुंग्यांनी मेरूपर्वत तर जिंकला नाही ना? असाच प्रकार झाला. पण क्रिकेटमध्ये असे प्रकार अनेकदा होतात. एका दशकापूर्वी, 12 मार्च 2006 रोजी “चोकर्स’ समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी पराभव करून क्रिकेटच्या अनिश्‍चततेचा प्रत्यय आणून दिला होता. त्या दौऱ्यात जोहान्सबर्गमधील पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कर्णधार पॉंटिंगच्या 164 धावाच्या जोरावर 434 धावांचा डोंगर, डोंगर कसला, साक्षात उत्तुंग हिमालय पर्वतच उभा केल्यानंतर त्याचा पाठलाग करायला उतरलेली दक्षिण आफ्रिकेची टीम जिंकेल असे कोणाही शहाण्याने म्हटले नसते, पण पण क्रिकेटच्या ग्लोरियस अन्सर्टनटीचा प्रत्यय तेव्हाही आला आणि हर्षल गिब्जच्या 175 आणि कर्णधार स्मिथच्या 90 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजयाला गवसणी घालत साऱ्या पंडितांचे अंदाज खोटे पाडले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात एक चेंडू आणि एक गडी राखून दक्षिण आफ्रिकेने विजय खेचून आणला होता.

तशाच पद्धतीने अफगाणिस्तानने अगदी 100 टक्के असलेला पराभव टाळत सामना बरोबरीत सोडवला-टाय केला. आशिया कप स्पर्धेतील हा पहिलाच टाय सामना ठरला आणि बदली कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा कर्णधार म्हणून हा विक्रमी पाचवा टाय सामना ठरला. धोनीचा हा विक्रम मोडला जाईल याची शक्‍यता जवळपास नाहीच. सुरुवातीला सहापेक्षा अधिक असलेली भारताची सरासरी नंतर चारपेक्षा कमी झाली. शेवटच्या तीन षटकात भारताला 17 धावांची आवश्‍यकता होती आणि भारताची धावसंख्या होती 7 बाद 236.

आफताब आलमच्या शेवटून तिसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर कुलदीप यादव बाद झाला.6 धावा निघाल्या पाचच्या चेंडूवर सिद्धार्थ कौल धावबाद झाला. वर शेवटच्या दोन षटकात 7 धावांची गरज असताना भारताची धावसंख्या होती 8 बाद 246 आणि. शेवटून दुसऱ्या षटकात रशीद खानने 4 धावा दिल्या आणि धावफलक 9 बाद 246. शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना जडेजाचा चौकार व एक एकेरी धाव आणि 6 धावा निघाल्या आणि जडेजा बाद झाला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
9 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
1 :cry:
16 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)