बछड्यांचा अपघात नव्हे, ही तर हत्याच : रविना टंडन

मुंबई – चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना – मामला मार्गावर रेल्वेने दिलेल्या धडकेत वाघिणिच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे काल समोर आले. ही दुर्घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर आतापर्यंत वाघ, बिबटे यांसारख्या अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या बछड्यांचा अंत झाल्यानंतर अभिनेत्री रविना टंडनने ट्विटरवरुन संताप व्यक्त केला आहे.

 टंडनने ट्विटर ट्विट केले आहे की, ‘ह्यांना देशातील जंगले नष्ट करुन महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचे आहेत. ही हत्या आहे.’ मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची रविना टंडन ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच त्या वन्यजीवांना हक्काचा नैसर्गिक अधिवास मिळावा, यासाठी ती कार्यरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)