महागठबंधन मध्ये बीजेडी नाही : पटनाईक

भुवनेश्‍वर: विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात जे महागठबंधन स्थापन करण्याचे प्रयत्न चालवले आहेत त्यात आमचा पक्ष सहभागी होणार नाही अशी स्पष्ट भूमिका बिजू जनता दल या पक्षाने घेतली आहे. या पक्षाचे प्रमुख व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आज ही माहिती दिली. त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की आमच्या पक्षाच्या धोरणानुसार आम्ही कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना समान अंतरावर ठेवणार आहोत.

विरोधकांनी महागठबंधन स्थापन करण्याचे प्रयत्न चालवले आहेत पण बिजू जनता दलाचा त्याच्याशी काही संबंध नसेल. पटनाईक यांनी नेहमीच राष्ट्रीय राजकारणात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यापासून दूरच राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांना युपीए तसेच एनडीए मध्ये घेण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी केला होता पण त्याला पटनाईक यांनी प्रतिसाद दिलेला नाही. बिगर भाजप, बिगर कॉंग्रेस अशी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशखेर राव यांनी चालवला आहे त्यालाही त्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)