#Video: ‘बेलुगा व्हेल’ मासा रशियाचा हेर? तज्ज्ञांनी व्यक्त केली शक्यता

ओस्लो (नॉर्वे) :नॉर्वेमध्ये समुद्रात बेलुगा व्हेल मासा आढळला आहे. मात्र या माशाबाबत धक्कादायक बाब म्‍हणजे या माशाच्या गळ्यात कॅमेरा आढळला असून हा कॅमेरा गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणारा असावा अशी शक्यता नॉर्वेतील तज्ज्ञांनी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नॉर्वे देशातील समुद्रात मासेमारी करत असताना तेथील मच्छिमारांना एक पांढऱ्या रंगाचा मासा आढळून आला. माशाच्या गळ्यात कॅमेरा पाहून नॉर्वे देशातील मच्छिमार आश्चर्यचकित झाले. त्‍यामुळे त्‍यांनी याबाबतची माहिती तात्‍काळ संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

नॉर्वेच्या समुद्रातील 'बेलुगा व्हेल' मासा रशियाचा हेर?, तज्ज्ञांनी व्यक्त केली शक्यता

नॉर्वेच्या समुद्रातील 'बेलुगा व्हेल' मासा रशियाचा हेर?, तज्ज्ञांनी व्यक्त केली शक्यताओस्लो (नॉर्वे) :नॉर्वेमध्ये समुद्रात बेलुगा व्हेल मासा आढळला आहे. मात्र या माशाबाबत धक्कादायक बाब म्‍हणजे या माशाच्या गळ्यात कॅमेरा आढळला असून हा कॅमेरा गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणारा असावा अशी शक्यता नॉर्वेतील तज्ज्ञांनी आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सविस्तर बातमी वाचा….. https://bit.ly/2XUYUIg

Posted by Dainik Prabhat on Tuesday, 30 April 2019

अधिकाऱ्यानी या प्रकाराची चौकशी केली असता त्‍यांना या बेलुगा व्हेलच्या गळ्याला बांधण्यात आलेल्या पट्ट्यावर इक्युपेमंट ऑफ सेंट पीट्सबर्ग असे लिहिलेले आढळून आले. यावरून हा प्रकार सामान्य नसून तो गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणारा व्हेल मासा असावा, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

 

बेलुगा व्हेलबदल माहिती –

बेलुगा व्हेलमाशाला बोली भाषेत पांढरा व्हेल म्हणतात. हा व्हेल प्रजातीतील सर्वात छोटा व्हेल आहे. बेलुगा व्हेलचा आकार २० फुटांपर्यंत असतो.

रशियाकडे अशा प्रकारचे अनेक घरगुती व्हेल आहेत. या व्हेलपैकीच काही मासे समुद्रात सोडले असण्याची शक्यता आहे. अशी माहिती, आर्कटिक विद्यापीठातील मरीन बायॉलॉजीचे प्रोफेसर आडन रिकॉर्ड्सन यांनी सांगितली आहे.

व्हेलच्या गळ्यातील हा कॅमेरा रशियाच्या नौसेनेचा असण्याची शक्यता असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी प्रसारित केल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)