स्टॅव्हेंजर – चीनच्या यू यानगी याने पाच वेळा विश्वविजेता असलेल्या विश्वनाथन आनंद याला पराभूत केले आणि नॉर्वे चषक बुध्दिबळ स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदविला. यानगी याने अर्मागेडन डावात 48 चालीस आनंदला शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले.
यानगी याचे आता आठ गुण झाले आहेत. विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याने साडेनऊ गुणांसह आघाडीस्थान घेतले आहे. अर्मेनियाच्या लिवोन आरोनियन हा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे साडेसात गुण झाले आहेत. वेस्ली सो याचे साडेसहा गुण झाले आहेत. तो सध्या चौथ्या स्थानावर आहे. आनंद व दिंग लिरेन यांचे प्रत्येकी साडेपाच गुण झाले आहेत. ते दोघेही संयुक्त पाचव्या क्रमांकावर आहेत. शाख्रीयर मामेद्यारेव्ह हा सातव्या क्रमांकावर आहे.