ट्रम्प यांच्या बरोबरच्या चर्चेला उत्तर कोरियाचा विधायक प्रतिसाद

ट्रम्प यांच्या प्रतिसादाचे केले ऐतिहासिक असे वर्णन

सेउल – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच उत्तर कोरियाच्या भूमीवर पाय ठेऊन राष्ट्रप्रमुख किम जोंग यांच्याशी थेट चर्चा केली. या चर्चेला कोरियाने विधायक प्रतिसाद दिला असून ही चर्चा ऐतिहासिक आणि आश्‍चर्यचकीत करणारी ठरली असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर कोरियाने आपल्याकडील अण्वस्त्र कपात करावी असा अमेरिका आणि साऱ्या जगाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने ही चर्चेची प्रक्रिया सुरूच ठेवण्याचे त्यांनी ठरवले आहे ही एक चांगली घडामोड आहे असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाने ट्विटरवर दिलेले निमंत्रण ट्रम्प यांनी स्वीकारल्यानेही त्या देशाने समाधान व्यक्त केले आहे.

ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात झालेली ही चर्चेची तिसरी फेरी आहे. भविष्यातही एकमेकांशी संपर्कात राहण्याचे आणि चर्चेची प्रक्रिया सुरूच ठेवण्याचे या दोन्ही नेत्यांनी मान्य केल्याने उत्तर कोरियाविषयीचा पेचप्रसंग सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)