उत्तर कोरियाची पुन्हा अमेरिकेला धमकी 

आर्थिक निर्बंध न उठवल्यास अण्विक कार्यक्रम पुन्हा सुरू करू 

सेऊल –
अमेरिकेने आमच्यावरील आर्थिक निर्बंध त्वरीत उठवावेत अन्यथा आम्हाला आमची अण्विक अस्त्रे बनवण्याचे काम पुन्हा सुरू करावे लागेल असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे. उत्तर कोरियाच्या अर्थमंत्रालयाने शुक्रवारी हे धमकीवजा इशारा देणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे. उत्तर कोरियाने आपला वादग्रस्त अण्विक कार्यक्रम सोडून द्यावा यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाने त्यांच्याशी चर्चा सुरू केली असली तरी त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध मात्र मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे उत्तर कोरियावरील दबाव वाढला आहे.

अमेरिकेने आपली भूमिका बदलून आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली नाही तर आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल त्यावेळी मात्र आम्ही कोणाच्याही दबावाला मान देणार नाही असेही उत्तर कोरियाने नमूद केले आहे. अमेरिकेबरोबरची चर्चेची प्रक्रियाही सोडून देण्याचा इशाराही या देशाने दिला आहे. आर्थिक निर्बंध आणि दबावाचा वापर करून आम्हाला निशस्त्र करण्याचा त्यांचा डाव असेल तर त्यांचा तो प्रयत्न हास्यास्पद आहे अशी स्पष्ट टिप्पणीही त्या देशाने केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या सौहार्दाच्या संबंधांवर पाणी पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेशी झालेल्या चर्चेनंतर उत्तर कोरियाने आपल्या अण्विक चाचण्यांवर स्वताहून निर्बंध आणले आहेत आणि त्यांनी आपली अणु फॅक्‍टरीही बंद केली आहे. पण तरीही अमेरिकेने किंवा जागतिक समुदायाने त्यांच्यावरील ्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌आर्थिक निर्बंध मागे घेतलेले नाहीत त्यामुळे उत्तर कोरियाचा संयम सुटत चालला आहे असे त्यांच्या या निवेदनातून स्पष्ट होते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)