उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय संरक्षणाची हमी मिळावी- पुतीन

मॉस्को, (रशिया) – जर उत्तर कोरियाने आण्विक निःशस्त्रीकरण करावे अशी अपेक्षा असेल, तर उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुरक्षेची हमी मिळायला हवी, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाबाबत सहा देशांच्या सहभागाच्या चर्चेचा प्रस्ताव त्यांनी माडला. यामुळे उत्तर कोरियासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षेची हमी वाढीस लागेल, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.

या सहा देशांच्या चर्चेला आता लगेच सुरुवात होऊ शकेल की नाही, हे आताच सांगता येऊ शकणार नाही. मात्र अशाप्रकारे चर्चेची सुरुवात झाली तर सुरक्षेची हमी निश्‍चितपणे निर्माण होऊ शकेल, असे पुतीन म्हणाले. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे प्रथमच रशियाच्या दौऱ्यावर आले असताना पुतीन यांनी हे मत व्यक्‍त केले आहे.
पुतीन आणि किम यांच्यातील शिखर बैठकीतील चर्चा सकारात्मक आणि विशेष सफल झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सकारात्मक आणि फलदायी चर्चेबद्दल किम यांनी पुतीन यांचे आभार मानले आहेत. सामाजिक समस्यांवरील तोडग्यासाठी आपण आपल्या भूमिकांची आदलाबदल करून विचार केला पाहिजे, असे किम यांनी यावेळी पुतीन यांना सुचवले.

रशियातील फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये किम आणि पुतीन यांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. आण्विक निःशस्त्रीकरण हा या चर्चेचा केंद्रबिंदू होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर किम यांची झालेली चर्चा अपयशी झाल्यामुळे पुतीन यांच्याबरोबरची चर्चा म्हणजे एक बंड असल्याचे काही राजकीय विश्‍लेषकांकडून म्हटले जात आहे. या वर्षी आणखी एकदा किम आणि पुतीन यांनी पुन्हा चर्चा करण्याचे मान्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)