सर्वसामान्य कश्‍मिरीला पाहिजे कलम 370 पासून मुक्तता

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर): राजकारण, फुटीरता आणि दहशतवाद यामध्ये भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य काश्‍मिरी जनतेला कलम 370 पासून मुक्तता पाहिजे आहे. या सर्वाच्या गोंधळात काश्‍मिरी जनता असहाय आणि असुरक्षित बनली आहे. मनात असूनही ती आपल्या भावना जगाला ओरडून सांगू शकत नाही.

कलम 370 आहे, तर ते कोठे आहे? ते दाखवा. या कलम 370 ने काश्‍मिरी जनतेची अवस्था न घरका ना घाटका अशी केलेली आहे. त्याने ना काश्‍मीरला भारताचे होऊ दिले, ना भारताला काश्‍मीरचे अशी भावना असल्याने कलम 370 रद्द करून टाकावे अशी लोकांची इच्छा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कलम 370 हे केवळ एक राजकीय घोषणा आणि काश्‍मिरींच्या भावनांचे शोषण करण्याचे साधन बनले असल्याचे मत काश्‍मीर विश्‍वविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने व्यक्त केले आहे. केंद्र सरकार पाहिजे तेव्हा जम्मू काश्‍मीरमध्ये केंद्रीय कायदे लागू करते. मात्र सरळपणे नाही, तर कलम 370 चा आग्रह धरणाऱ्या राजकीय पक्षांमार्फतच ते केले जाते.

पश्‍चिम बंगालचे पाहा, असे सांगून तो विद्यार्थी पुढे म्हणतो, की पश्‍चिम बंगालमध्ये 370 कलम नाही. पण तरीही बंगाल्याची स्वतंत्र ओळख संपुष्टात आली का? तेथेही ममताच्या मर्जीविना अमित शहांची रॅली होऊ शकत नाही. मग काश्‍मीरमधील राजकारण्यांना कलम 370 का पाहिजे? त्याचे कारण एकच की त्याचा वापर कारून दिल्लीला ब्लॅकमेल करता येते. आपली सत्ता राखता येते. फुटीरतेला पोषक राखता येते. कलम 370 काढले तर नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीसारखे पक्ष सत्ताभ्रष्ट होतील.

येथे पाकिस्तानकडे वळणारा एक वर्ग आहे, पण त्याहूनही मोठा वर्ग भारताच्या बाजूचा आहे. बस याच मुद्‌द्‌यावर चर्चा व्हायला पाहिजे. कलम 370चा जनाजा तर केव्हाच निघून गेला आहे, आहे तो रिकामा ताबूत, आणि हे प्रत्येक काश्‍मिरी जाणतो. असे बडगामचे डॉ. अली म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)