सईद, सलाहुद्दीन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट 

नवी दिल्ली  – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा संघटनेचा संस्थापक हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा प्रमुख सैद सलाहुद्दीन यांच्याविरोधात येथील विशेष एनआयए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. दहशतवादासाठी पैसे पाठवण्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने हे पाऊल उचलले.

काश्‍मीर खोऱ्यासह भारतातील विविध भागांत अस्वस्थता निर्माण करण्याच्या उद्देशातून सईद आणि सलाहुद्दीन सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले जावे, अशी विनंती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केली होती. ती विशेष न्यायालयाने मान्य केली. भारताविरोधात युद्ध छेडण्याचे सईद आणि सलाहुद्दीनचे नापाक मनसुबे आहेत. त्यासाठी ते पाकिस्तानात प्रशिक्षण मिळालेल्या दहशतवाद्यांना काही विभाजनवादी नेत्यांच्या मदतीने भारतात पाठवत आहेत, असा आरोप एनआयएकडून करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी पैसे पाठवण्याशी संबंधित प्रकरणी एनआयएने मे 2017 मध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर याप्रकरणी चालू वर्षाच्या प्रारंभी सईद आणि सलाहुद्दीन यांच्यासह 12 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तपासादरम्यान एनआयएने जम्मू-काश्‍मीर, दिल्ली आणि हरियाणातील साठहून अधिक ठिकाणी छापे टाकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)