उपहार चित्रपटगृह आग प्रकरणी दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट 

नवी दिल्ली – दिल्लीत 1997 साली झालेल्या उपहार चित्रपटगृह जळीतकांड प्रकरणी आरोपी सुशिल अन्सल आणि गोपाल अन्सल यांच्याविरोधात दिल्लीतील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करण्याच्या आरोपावरून सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित न राहण्यामुळे मुख्य महानगर दंडाधिकारी दीपक शेरावत यांनी या दोन्ही रिअल इस्टेट व्यवसायिकांना हे वॉरंट बजावले आहे.

उपहार चित्रपटगृहाला लागलेल्या आगीत नीलम कृष्णमूर्ती यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्याशी संबंधित काही नोंदींमध्ये फेरफार होण्याच्या आरोपाची सुनावणी दिल्लीतल्या न्यायालयापुढे सुरू आहे. उपहार चित्रपटगृहातील आगीमध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने कृष्णमूर्ती गेली 20 वर्षे कायदेशीर लढाई लढत आहेत. 13 जून 1997 साली या चित्रपटगृहामध्ये लागलेल्या आगीत 59 जणांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)