#MeToo: ‘त्या’ गोष्टी सहमतीनेच : शिल्पा शिंदे

मुंबई – गेल्या काही दिवसात #MeToo मोहिमेद्वारे अनेक वरिष्ठ सिनेअभिनेत्यांवर आरोपांची मालिका सुरु असून अशा प्रकारचे आरोप लावणाऱ्या महिला कलाकारांदेखील संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र आज  बिग बॅास 11 ची विनर ठरलेल्या शिल्पा शिंदेने #MeToo मोहिमेवर  आक्षेप नोंदवला आहे. शिल्पा शिंदेने  एका नामांकित माध्यमाशी बोलताना म्हंटले की, ”इंडस्ट्रीमध्ये कोणीच कोणाचा रेप करत नसते, उलट या ‘सर्व’ गोष्टी सहमतीने होत असतात.”

शिल्पा एवढंच बोलून थांबली नाही तर तिने पुढे बोलताना म्हंटल की, “वेळ निघून गेल्यावर आरोप करत बसणं हे मूर्खपणाच लक्षण आहे, माझ्या मते जेव्हा अशा घटना घडतात तेव्हाच त्या बद्दल आवाज उठवला पाहिजे. वेळ निघून गेल्यास आवाज उठवून काहीच फायदा होत नाही   मी सुद्धा इंडस्ट्रीमध्ये राहून अनेक धडे शिकली आहे.”

-Ads-

#MeToo ही भविष्यात  फक्त एक कंट्रोवर्सी म्हणून ओळखली जाणार आहे, मला हेच समजत नाहीये की का, प्रत्येक जन  इंडस्ट्रीचे नाव खराब करण्यामागे लागला आहे? इंडस्ट्रीमध्ये कोणी कोणाचा रेप करत नाही,येथे हे सर्वकाही सहमतीने होत असते. तुम्ही जर या परिस्थिती समोर जाणार नसाल तर ते तिथेच सोडून द्या .

What is your reaction?
12 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)