भीमा-कोरेगावला जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही- प्रकाश आंबडेकर

आम्हाला रोखण्याची भाषा करणारे सामाजिक न्याय राज्यमंत्री हे बिनडोक आहेत 

अहमदनगर: भीमा-कोरेगावला जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा इशारा भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. गेल्यावर्षी भीमा कोरेगावला दंगलीची स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे यावर्षी  कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी दिली जाणार नाही असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसापूर्वीच स्पष्ट केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले “आम्हाला रोखण्याची भाषा करणारा सामाजिक न्याय राज्यमंत्री हा बिनडोक आहे. किंबहुना राखीव जागांवरील भुंकणारी कुत्री असून , त्यांना जे सांगितले तेवढेच काम करत असतात”, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे 

  • मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने ओबीसी समाज अस्वस्थ
  • निवडणूक काळात मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडण होण्याची भीती
  • मराठ्यांनी ओबीसीची आधीची २७ टक्के व आता १६ टक्के आरक्षणावर कब्जा केल्याची निर्माण झाली भावना
  • गायकवाड समितीचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा
  • राफेल प्रकरणात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला खोटी माहिती दिली

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)