आता मोदींना कोणीही वाचवू शकत नाही : राहुल गांधी

नवी दिल्ली: राफेल प्रकरणातून आता पंतप्रधान मोदी यांना कोणीही वाचवू शकत नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा यांची पुन्हा त्या पदावर नियुक्ती करावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे, त्या निर्णयाचे राहुल गांधी यांनी स्वागत केले आहे.

वर्मा यांना त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्त करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे त्याचा राफेलशी संबंध आहे काय असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की राफेल प्रकरणात वर्मा माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते म्हणूनच त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त करण्यात आले असून मोदींना राफेलपासून कोणीही वाचवू शकत नाही असे राहुल गांधी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदींनीच अनिल अंबानी यांना राफेलचे तीस हजार कोटी रूपयांचे कंत्राट दिले हा दावा आता ठामपणे सिद्ध होईल या बाबत कोणतीही शंका उरलेली नाही असा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला. वर्मा यांनी राफेल प्रकरणात चौकशी सुरू केल्यानेच त्यांना मध्यरात्री एक वाजता त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. आता त्यांच्या बाबतीत न्याय झाला आहे अशी प्रतिक्रीयाही त्यांनी दिली.

काय म्हणाले जेटली
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रीया देताना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने समतोल भूमिका घेऊन निर्णय दिला आहे. सरकारने कोणाच्याही बाबतीत पक्षपाती भूमिका घेतलेली नाही. सीबीआयचे हे दोन अधिकारी एकमेकांशी भांडत होते. त्यामुळे सीबीआयची विश्‍वासर्हता आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी त्यांना या पदावरून दूर ठेवण्यात आले होते असे प्रतिपादन त्यांनी केले. केंद्रीय दक्षता आयोगाकडून करण्यात आलेल्या शिफारशीवरूनच त्यांना या पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही जेटली यांनी पत्रकारांना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)