‘राफेल’पासून मोदींना आता कोणीच वाचवू शकत नाही : राहुल गांधी 

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी आज सीबीआय प्रकरणाच्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे झोड उठवली. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांची सरकारने मध्यरात्री केलेली उचलबांगडी सुप्रीम कोर्टाने आज धुडकावून लावली. याबाबत लोकसभेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “आता राफेल घोटाळ्यापासून नरेंद्र मोदी यांना कोणीही वाचवू शकणार नाही. मोदींनी जनतेच्या कष्टाचा पैसा त्यांचे मित्र अनिल अंबानी यांना दिला असून, मोदींचे हे गौडबंगाल लवकरच देशाच्या जनतेपुढे खुले होईल.”

यावेळी त्यांनी सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांची सीबीआय संचालक पदी फेर निवड करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही स्वागत केले. सीबीआय संचालकांच्या उचलबांगडीवरून त्यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप लावले. ते म्हणाले, “सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना मध्यरात्री १ वाजता त्यांच्या पदावरून हटविण्यात आले होते कारण ते राफेल घोटाळ्याबाबत पुरावे जमा करीत असल्याची बातमी सरकारला समजली होती. अलोक वर्मा यांची आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरनियुक्ती झाली असून आता पुढे काय घडते हे पाहावे लागेल.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup:
6 :heart:
3 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
54 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)