पाकिस्तानी कलाकारांना नो व्हिसा – फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजची मागणी

मुंबई- पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्यूझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाला घेतले तर गाणे प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (AICWA) दिला होता. या बंदीनंतर आता पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारण्यात यावा अशी नवी मागणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (AICWA) तर्फे करण्यात आली आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने पत्र लिहीत मागणी केली आहे कि,पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा आम्ही निर्णय यापूर्वी घेतला आहे. मात्र,या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी काही कठोर पावल सरकरान उचलावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे, पाकिस्तानी कलाकार, फिल्म एसोसिएशन आणि माध्यम प्रतिनिधी यापैकी कोणालाही व्हिसा मिळणार नाही याची खबरदारी सरकारन घ्यावी. हि सविस्तर मागणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने सरकारला केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)