सॅटेलाईट कॅम्पसचा प्रस्ताव नाही

नवी दिल्ली: दिल्लीतील जेएनयु विद्यापीठ, आयआयटी किंवा आयआयएमचे सॅटेलाईट कॅम्पस द्वारे अन्यत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही अशी माहिती सरकारतर्फे आज लोकसभेत देण्यात आली. मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री सत्यपालसिंह यांनी सांगितले की अशा प्रकारच्या कोणत्याही संस्थांचे सॅटेलाईट कॅम्पस सुरू करण्याचे सरकारचे धोरण नाही त्यामुळे अशा कॅम्पसना अनुमती देता येणार नाही.

वास्तविक जेएनयु विद्यापीठाचे कुलगुरू जगदेशकुमार यांनी ऑक्‍टोबर महिन्यात जेएनयु विद्यापीठाचे सॅटेलाईट कॅम्पस सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे जाहींर केले होते. एवढेच नव्हे तर त्यासाठी एक तज्ज्ञांची समितीही नेमण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर संबंधीत खात्याच्या मंत्र्यांनी मात्र त्यांच्या प्रतिसादाच्या नेमके उलट उत्तर दिले आहे. असे कॅम्पस सुरू करण्याचे सरकारचे धोरणच नाही असे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जेएनयुचे कुलगुरू अडचणीत आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)