वंचित आघाडीच्या उमेदवारांना त्यांच्या तालुक्यात देखील कोणी ओळखत नाही- धनंजय मुंडे

वंचित आघाडीच राजकारणं हे संघ आणि भाजपाला मदत करण्यासाठी 

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. वंचित बहुजन आघाडीचे ४ खासदार देखील निवडून येणार नाहीत. तसेच त्यांच्या उमेदवारांना कोणी ओळखत नाही. वंचित आघाडीची वाटचाल भाजपाला मदत करणारी दिसून येत असल्याचे मुंडे म्हणाले, एका वेबसाईटला दिलेल्या मुखातील मुंडे बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले, वंचित आघाडीच राजकारणं हे संघ आणि भाजपाला मदत करण्यासाठी असल्याचे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आघाडीचा लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम दिसेल असे वाटत नाही. वंचित आघाडी वेगळी लढावी अशी मानसिकता, काँग्रेस-राष्ट्रवादीची नव्हती. अनेकवेळा आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा केली आणि आघाडीत सामील होण्यास सांगितले जेणेकरून मतांचे विभाजन होणार नाही. मात्र त्यांनी १२ जागा मांगितल्या, आम्ही ४ जागा निश्चित केल्या. त्यानांतर २ ते ३ जागा वाढविण्यासही आम्ही तयार होतो. मात्र, ते चर्चा करण्यास तयार नव्हते, असे मुंडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)