मला या देशातून कोणीच बाहेर घालवू शकत नाही : असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद: आम्ही सत्तेवर आलो तर निजाम जसा हैदराबादहून पळाला तसे असदुद्दीन ओवैसी यांना येथून पळून जावे लागेल असे विधान नुकतेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी तेलंगणातील प्रचार सभेत केले होते. त्याला आज ओवैसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की हा माझ्या वडिलांचा देश आहे मला येथून कोणीच बाहेर घालवू शकत नाहीं. योगी हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या पदाला शोभतील अशीच विधाने करावीत त्यांनी आपल्या साऱ्या मर्यादा सोडल्या आहेत अशीही टीका त्यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की निजामही देश सोडून पळून गेला नव्हता. त्यांना येथील राजप्रमुख केले गेले होते. आणि चीन विरूद्धच्या भारताच्या युद्धाच्यावेळी त्यांनी आपल्याकडील सोने देशाला अर्पण केले होते. योगींना इतिहासीची माहिती नाहीं असेही ते म्हणाले. मला घाबरवण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

-Ads-

योगींनी आपली मर्यादा सोडून प्रचार करण्यापेक्षा त्यांनी आपल्या मतदार संघाकडे लक्ष द्यावे. तेथे दर वर्षी विविध आजाराने दीडशे बालकांचा मृत्यू होत असतो त्याकडे आधी लक्ष द्यावे.ओवैसी यांचे धाकटे बंधु अकबरूद्दीन यांनीही योगींच्या विधानांचा निषेध केला. ते म्हणाले की आमच्या पुढल्या हजार पिढ्या भारतातच राहतील. आम्हाला येथून कोणीही बाहेर घालवू शकत नाहीं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)