विदर्भातील एमआयडीसी मध्ये एकही नवीन रोजगार आला नाही ; भाजप आमदाराचे धक्कादायक पत्र

भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढल्याचेही पत्रात नमूद

मुंबई: आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आशिष देशमुख यांनी लिहिलेले पत्र समोर आले आहे. भाजपाचे सदस्य म्हणून आशिष देशमुख २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरच्या काटोल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. मात्र या सरकारच्या सर्व पातळ्यांवरील अपयशामुळे वैतागून अखेर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षय जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी सदर पत्र सोशल मीडियावर शेयर केले आहे. जयंत पाटील म्हणाले, विदर्भाच्या प्रश्नांवर देशमुख यांनी पत्रात सविस्तर मांडणी केली असून, विदर्भाच्या परिसरातील एमआयडीसी मध्ये एकही नवीन रोजगार आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने केलेले हे विधान भाजपा समर्थकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढल्याचेही पत्रात नमूद केले असल्याचे पाटील म्हणाले.

जयंत पाटील समोर म्हणाले, या पत्रात आशिष देशमुख यांनी फडणवीस सरकारच्या अपयशाची अक्षरशः चिरफाड केली आहे. ‘विकासापेक्षा धार्मिक उन्मदाला आणि अस्मितेच्या प्रश्नाला महत्व देऊन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे देशमुख म्हणतात. भाजपाच्या निवडक उच्चशिक्षित आमदारांपैकी एकास भाजपला वैतागून राजीनामा द्यावा लागतो हि बाब याठिकाणी नमूद करायला हवी.

आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आशिष देशमुख यांनी लिहिलेले पत्र प्राप्त झाले. भाजपाचे सदस्य म्हणून आशिष देशमुख…

Posted by Jayant Patil – जयंत पाटील on Monday, 19 November 2018

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)