मनोमिलन नाही

मुंबई – खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन होणार की नाही? या प्रश्‍नाचे उत्तर आता जवळपास मिळल्यात जमा आहे. कारण हे मनोमिलन होणार नाही, असे सुचक वक्‍तव्य आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले हे रविवारी बदलापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना उदयनराजेंसोबत मनोमिलन होणार का? असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून मला त्यांच्या पाठीशी उभे रहावे लागेल, असे सुचक वक्‍तव्य शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. ज्यांना ज्यांना त्रास झाला आहे, ज्यांना आपल्यावर अन्याय झाल्यासारखे वाटत आहे, अशा लोकांना मी रोखू शकत नाही. त्यांच्या भावनांचा आदर करणे हे माझे काम आहे. असे म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांनी उदयनराजेंसोबत मनोमिलन होऊ शकत नाही, असे सुचित केले आहे. साताऱ्याच्या या दोन राजेंनी एकत्र यावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून  प्रयत्न सुरू आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुध्दा अलिकडेच डोक शांत ठेवा, असा सल्ला त्यांना दिला होता. त्यामुळे पवारांच्या शिष्टाईने दोन राजांचे मनोमिलन होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. मात्र शिवेंद्रराजे यांचे काही समर्थक शरद पवार यांच्या भेटीला गेले, आणि त्यांनी उदयनराजेंबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त केल्याचे समजत आहे. त्यानंतर आता शिवेंद्रराजेंनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचे सांगत मनोमिलनाची शक्‍यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे सातारच्या राजकारणातला दोन राजांमधील संघर्ष यापुढेही कायम राहण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)