मध्य प्रदेशात कार्यक्रमाच्या-योजनांच्या घोषणा मंत्री नाही तर अधिकारी करणार : कमलनाथ

छिंदवाडा (मध्ये प्रदेश): मध्य प्रदेशात यापुढे कोणत्याही कार्यक्रमाच्या-योजनांच्या घोषणा राज्याचे मुख्यमंत्री वा मंत्री नाही, तर अधिकारी करतील, असे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले आहे. आजवर साऱ्या घोषणा करण्याचे काम फक्त मुख्यमंत्री वा मंत्री करत असत, यापुढे मात्र सर्व घोषणा संबधित विभागाचे अधिकारी करणार आहेत.

लोक घोषणा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना त्याबाबत हिशोब मागू शकतील, जाब विचारू शकतील असेही कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे पोलो मैदानावर बोलताना स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, आजवर घोषणा भरपूर झाल्या, पण त्यातील प्रत्यक्षात किती आल्या हे सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर कमलनाथ यांचा हा या भागात पहिलाच दौरा होता. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक घोषणा केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)