भारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री

मुंबई – पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव फिल्मसिटी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली. दुपारी 2 ते 4 या दोन तासांसाठी चित्रीकरण बंद ठेवण्यात आले. यावेळी पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्यूझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाला घेतले तर गाणे प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने दिला आहे. यावेळी कलाकारांसह क्रिकेटर हरभजन, सहवाग, रैना, कैफ यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.

पाकिस्तानी गायकांशी कोणताही करार करू नका, असा इशारा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडीच्या संगीत कंपन्यांना दिली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ही माहिती दिली. टी-सीरीज, सोनी म्युझिक, व्हीनस, टिप्स म्युझिक सारख्या कंपन्यांना आम्ही देशातील जनतेच्या भावना कळवल्या आहेत. या कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांसोबत काम करणे ताबडतोब थांबवले पाहिजे. तसं न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेवू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भूषण कुमार यांच्या टी-सीरिजने अलीकडंच राहत फतेह अली खान व आतिफ अस्लम यांच्याशी दोन गाण्यांसाठी करार केला आहे. मात्र, मनसेच्या इशाऱ्यानंतर कंपनीने यू-ट्यूब चॅनेलवरून त्यांची गाणी तात्काळ हटवली आहेत. तर कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडकरांनी संधी देवू नये, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)