एसटीमध्ये ठणठणात, नागरिकांची गैरसोय

सातारा  – दिपावलीच्या सुट्ट्यांमुळे बॅंका बंद आणि एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. शनिवार आणि रविवारही जोडून आल्याशिवाय हातात रोकड पडण्यासाठी नागरिकांना आता सोमवारची वाट पाहावी लागणार आहे. दिपावली, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बहुतेकांनी बॅंकातून एटीएममधून पैसे काढले. त्यामुळे एटीएम रिकामी झाली आहेत.

सध्या दिपावलीची सुट्टी आणि यानंतर शनिवार आणि रविवार जोडून आल्यामुळे बॅंक बंद राहिल्या आहेत. अनेक बॅंकांच्या एटीएममध्येही खडखडाट असल्याने नागरिकांची मोठी गैरेसोय झाली आहे. ज्याठिकाणी एटीएम सुरू आहे, तिथे नागरिकांची गर्दी दिसून येत होती. सलग सुट्ट्या असल्यानंतर नेहमीच अशी गैरसोय होत असते. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. बॅंकांना सलग सुट्टया असल्या तर किमान एटीएममध्ये मुबलक भरणा करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)