फलटणकरांसाठी करवाढ नसलेला अर्थसंकल्प

तब्बल 158.44 कोटींचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर

फलटण  – फलटण नगरपरिषद यंदाचा 158 कोटी 44 लाख 36 हजार 169 रुपये जमेच्या बाजूला आणि 158 कोटी 41 लाख 35 हजार 136 रुपये खर्चाच्या बाजूला आणि 3 लाख 1 हजार 33 रुपये वर्षाखेर शिल्लक दाखविणारा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे यांनी सभागृहासमोर मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला असून कोणतीही करवाढ नसलेला मात्र उत्पन्नात वाढ असलेला अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण नगरपरिषद 2018-2019 या आर्थिक वर्षाचा सुधारित आणि 2019-2020 या वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहासमोर ठेवून त्याला मंजुरी घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या नगरपरिषद सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. नेवसे यांनी मांडल्यानंतर त्यावर झालेल्या चर्चेनुसार काही बदल सुचवण्यात आले. त्यानंतर अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पात जमेच्या बाजूला महसुली जमा 28 कोटी 71 लाख 29 हजार तीनशे दाखवले असून त्यामध्ये 8 कोटी 97 लाख 68 हजार महसुली उत्पन्न दाखवले आहे. त्यामध्ये 6 कोटी 5 लाख 58 हजारांचा संकलित कर दाखवला असून गतवर्षी संकलित कर अपेक्षित उत्पन्न 4 कोटी 60 लाख असताना आणि यावर्षी अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आली नसताना संकलित कर उत्पन्नातील वाढ ही शहरातील जुन्या बांधकामांचा विस्तार व नवीन बांधकामे यामुळे वाढ अपेक्षीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महसुली अनुदाने व अन्य मार्गाने 6 कोटी 45 लाख अपेक्षीत असल्याचे दिसते. नगर परिषद मालमत्तापासून 1 कोटी 43 लाख 13 हजार 200 अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पात खर्चाच्या बाजूला 28 कोटी 35 लाख 85 हजार 136 रुपये दाखवण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने 12 कोटी 50 लाख 95 हजार 434 रुपये आस्थापना खर्च, 5 कोटी 45 लाख 75 हजार 500 प्रशासकीय खर्च, 35 लाख व्याज व वित्त आकार, नगर परिषद मालमत्ताची दुरुस्ती देखभाल खर्च 4 कोटी 19 लाख 50 हजार रुपये दाखविण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात भांडवली जमेच्या बाजूला विशिष्ट प्रयोजनासाठी अनुदाने-अंशदाने 71 कोटी 55 लाख 2 हजार, सुरक्षीत व असुरक्षित कर्ज 2 कोटी 15 लाख 6 हजार 968 रुपये, 4 कोटी 42 लाख 62 हजार अपेक्षीत ठेवी, इतर देणी 4 कोटी 80 लाख 40 हजार दाखवले आहेत. अर्थसंकल्पात खर्चच्या बाजूला स्थिर व जंगम मालमत्ता सदरात 127 कोटी 66 लाख 50 हजार, प्रगतीपथावरील भांडवली कामासाठी 19 लाख रुपये दाखवण्यात आले आहेत.

अर्थसंकल्प सभा सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, सभागृहातील विरोधी पक्षाचे गटनेते अशोकराव जाधव, स्वीकृत नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके), नगरसेवक सचिन अहिवळे, सौ. मदलसा कुंभार आदींनी शहरातील अतिक्रमणे प्रचंड वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्याबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली

“स्वच्छ भारत’मध्ये योगदान दिलेल्यांना संकलीत करात सूट

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान शहरवासीयांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये मोठे योगदान दिल्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत जे मिळकतधारक घरातील कचऱ्यावर वैयक्तिक पातळीवर किंवा अपार्टमेंटद्वारे कंपोस्ट खत निर्मिती, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरेमध्ये उल्लेखनीय काम करतील अशा मिळकत धारकांना त्यांचे मिळकतीवरील संकलित करात 5% सूट देण्याची योजना सार्वजनिक आरोग्य समिती सभापती अजय माळवे यांनी विस्ताराने मांडली. ती एकमताने मान्य करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)