दिल्लीत महागठबंधन नाही – केजरीवाल

नवी दिल्ली – कॉंग्रेसने दिल्लीत आमच्याशी आघाडी करण्यास मनाई केली आहे त्यामुळे दिल्लीत महागठबंधन होण्याची शक्‍यता आता मावळली आहे आम्ही येथील निवडणूक स्वबळावरच लढवणार आहोत असे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. आज येथे एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की ते आमच्याशी चर्चा न करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे दिल्लीत आता तिरंगी लढती होतील.

कॉंग्रेसला आम्ही आमच्या बरोबर या असे आवाहन वेळोवेळी केले पण त्यांनी त्याला कोणताच प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे आम्ही आता तो नाद सोडून दिला आहे असे ते म्हणाले. मोदींना सत्तेवरून घालवण्यासाठी आम्ही कॉंग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला होंता आमची ही भूमिका योग्य होती असे ते म्हणाले. आमचे कॉंग्रेसशी विशेष प्रेम आहे असे नव्हे पण मोदी शहा या जोडगोळीने देशाची पुर्ण वाट लावली असून पाकिस्तानपेक्षाही या देशाची स्थिती भीषण होत असल्याने आम्ही कॉंग्रेसला बरोबर घेऊन निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपला हरवण्यासाठी आम्ही कोणालाही बरोबर घेण्यास तयार होतो असे ते म्हणाले. कॉंग्रेसच्या स्वबळावर लढण्याच्या नाऱ्याने उत्तरप्रदेश, पश्‍चिम बंगाल अशा ठिकाणी विरोधकांची आघाडी कमकुवत होत आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली. तथापि दिल्लीतल्या सातही मतदार संघात आम्ही मजबूत आहोत असा दावाही केजरीवालांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)