लोकसभा निवडणुकीपुर्वी नितीश कुमारांचा भाजपाला ‘राम-राम’ 

कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचा दावा 
पाटणा: आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपची साथ सोडण्याची शक्‍यता आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केले आहे. ते म्हणाले की नितीशकुमार हे असे नेते आहेत की ते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. मोदींची लोकप्रियता ढासळत असून याचा अंदाज त्यांना आला असल्याने ते मोदींच्या गोटातून लवकरच बाहेर पडण्याची शक्‍यता आधिक आहे.
नितीशकुमार यांच्या राजकारण शैलीबद्दल बोलताना ते म्हणाले की नितीशकुमार हे 24 तासाच्या आत कोठेही पलटी मारू शकतात. लोकसभा निवडणुका अजून सहा महिने लांब आहे त्यामुळे त्यांचा यावेळीही युटर्न निश्‍चीत दिसतो आहे. कॉंग्रेस नितीशकुमारांना आपल्या गोटात घेईल का असे विचारता ते म्हणाले की राजकारण हे आर्ट ऑफ पॉलिबलिटीचे असते. सन 2013 साली त्यांनी भाजपबरोबरचे 17 वर्षांचे संबंध एका दिवसात तोडले होते आणि त्यांनी कॉंग्रेस व अन्य पक्षांबरोबर महाआघाडी केली होती.
त्यानंतर त्यांनी अचानक पुन्हा क्रॉंगेस व अन्य मित्र पक्षांना सोडून भाजपशी पुन्हा हातमिळवणी केली होती त्यामुळे त्यांचे हे धरसोडीचे राजकारण पहाता ते आता भाजपशी संगत सोडण्याचीच शक्‍यता आधिक आहे. तथापी नितीशकुमार यांना महाआघाडीचे दरवाजे आता बंद झाले आहेत असे राजदेचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. त्याकडे लक्ष वेधले असता त्यावर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)