नितीश पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत : प्रशांत किशोर 

शिवसेनेला मदत करणार असल्याचा इन्कार

पाटणा  –बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे एनडीएमधील बडे नेते आहेत. मात्र, पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहणे योग्य ठरणार नाही, अशी स्पष्टोक्ती निवडणूक रणनीतीज्ञ आणि जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सोमवारी केली. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान बनतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

किशोर यांनी नुकतीच मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पुरेसे संख्याबळ गाठता आले नाही तर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीश यांच्या पाठिशी उभे राहण्याबाबत शिवसेना आणि जेडीयूमध्ये वाटाघाटी झाल्याचेही बोलले जात आहे. त्याचा येथे पत्रकारांशी बोलताना किशोर यांनी एकप्रकारे इन्कार केला. मी उद्धव यांच्या निमंत्रणावरून त्यांची भेट घेतली. मी निवडणूक रणनीतीबाबत शिवसेनेला मदत करणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. मी एका पक्षाचा सदस्य आहे. त्यामुळे कुठली व्यावसायिक स्वरूपाची मदत करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रियांका यांचा लगेचच मोठा प्रभाव पडणार नाही

लोकसभा निवडणुकीसाठी केवळ दोन ते तीन महिन्यांचा अवधी बाकी आहे. एवढ्या कमी कालावधीत प्रियांका गांधी कॉंग्रेससाठी मोठा प्रभाव पाडू शकणार नाहीत. मात्र, त्यांचे नाव मोठे असून त्या लोकप्रिय आहेत. भविष्यात त्या एनडीएसाठी आव्हान ठरू शकतात, असे मत किशोर यांनी व्यक्त केले. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)