नागपूर – भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना अचानक भोवळ आली होती. त्यानंतर नागपुर मध्ये दाखल झाल्यानंतर गडकरी यांनी स्वतः माहिती देत आपली प्रकृती उत्तम असल्याचे म्हंटले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील प्रचार सभेत बोलताना नितीन गडकरींनी आपलं भाषण आटोपतं घेतलं आणि त्यानंतर लगेच त्यांना भोवळ आली होती. यानंतर नागपूरकडे रवाना होताना गडकरी यांची शिर्डी विमानतळावर डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. नागपूरमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी आपली प्रकृती अगदी ठणठणीत असून, काळजी करण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. ज्या हितचिंतकांनी या काळामध्ये विचारपूस केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, गडकरींना याआधीही अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती.