नागपूर: नागपुरातल्या चक्क एका उमेदवार यादीत केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारला आहे. नागपुरातील न्यू-इंग्लिश स्कुलमधल्या मतदान केंद्रावर हा प्रकार मतदानाच्या दिवशी घडला.
मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी उमेदवारीची यादी मतदान केंद्राबाहेर लावली जाते. न्यू-इंग्लिश स्कुलच्या बाहेर सुद्धा ही यादी लावण्यात आली होती. मात्र, या यादीमध्ये गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारण्यात आला होता. हा शिक्का कुणी मारला हे अद्याप समजू शकले नाही