नितीन गडकरी यांनी केले इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक

नागपुर: भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मध्यंतरी नेहरूंचे कौतुक करणारी विधाने केली होती. आता त्यांनी संघ परिवाराचा नेहमीच टिकेचा विषय ठरलेल्या कॉंग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांचेहीं कौतुक केले आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रविवारी नागपुरात एका महिला बचत गटाने सुरू केलेल्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलताना त्यांनी इंदिराजींवर कौतुक सुमने उधळली. ते म्हणाले की महिलांसाठी कोणतेही आरक्षण नसताना स्व. इंदिरा गांधी यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आणि कॉंग्रेस मधील त्या वेळच्या कोणत्याही नेत्यापेक्षा त्यांचे नेतृत्व उजवे ठरले. आपला महिलांच्या आरक्षण विधेयकाला विरोध नाही पण जात आणि धर्माच्या नावाने राजकारण करण्यास आपला विरोध आहे असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंदिरा गांधी यांच्या विषयी कौतुगोद्‌गार काढल्यानंतर त्यांनी सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, सुमित्रा महाजन या कर्तबगार महिला नेत्यांच्या नावाचीही उल्लेख केला. ते म्हणाले की आज धर्म आणि जातीच्या नावाने होणारे राजकारण थांबले पाहिजे. लोकांनी आपल्या ज्ञानाचा आणि कर्तुत्वाच्या आधारे मोठेपण मिळवले पाहिजे असे ते म्हणाले.

आज आपण साईबाबा, गजानन महाराज, तुकडोजी महाराज यांच्या जातीविषयी कधी बोलतो काय असा सवाल त्यांनी केला. शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, डॉ आंबेडकर यांची जात आपण विचारतो का असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे धर्मजातीच्या राजकारणाच्या भानगडीत पडू नका असा सल्ला त्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)